पुणे : येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एका महिला सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. दरम्यान यावरूनच आता भाजपचे नेते जगदीश मुलीक यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
‘लोकांसाठी मंदिरं उघडावीत म्हणून आम्ही आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होतो पण खुलेआम महिला सरपंचाला मारहाण करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मोकळा फिरतो आहे. अरे सत्तेचा किती माज कराल? आया-बहिणीचा तळतळाट घेऊन फिरणाऱ्या तुम्हाला जनता माफ करणार नाही.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
#राष्ट्रवादीची गुंडगिरी!
लोकांसाठी मंदिरं उघडावीत म्हणून आम्ही आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होतो पण खुलेआम महिला सरपंचाला मारहाण करणारा @NCPspeaks चा कार्यकर्ता मोकळा फिरतो. अरे सत्तेचा किती माज कराल? आया-बहिणीचा तळतळाट घेऊन फिरणाऱ्या तुम्हाला जनता माफ करणार नाही. @ChitraKWagh pic.twitter.com/GyX37hTjj1
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) September 4, 2021
सदरील घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असे आहे. या घटनेविरुद्ध गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरूनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर संतप्त स्वरूपातील टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांना वाटतोय विश्वास
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

