🕒 1 min read
नागपूर : त्रिपुरातील घटनेचे पडसाद राज्यात अमरावती, नांदेडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीमध्ये या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तरीही आज भाजपकडून धंतोली ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यावरूनच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज ते नागपुरात बोलत होते.
त्रिपुरा येथील कथित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्याचाच निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटनांनी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. त्यामुळे अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशानुसार 5 जणांना एकत्र येण्यास मनाई आहे.
भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज धंतोली ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आम्ही जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही, असं चंद्रकांत बावनकुळे म्हणाले. भाजपच्या मोर्चावर आता दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जमावबंदी असताना तुम्ही जर मोर्चे काढत असाल तर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी भाजपला दिला आहे. तसेच हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून अहवाल आल्यानंतर यामध्ये कोण सहभागी आहे याबाबत खरी माहिती मिळेल, असंही गृहमंत्री म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- ‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार
- या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं; केदार शिंदे भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

