Share

पूर्ववैमनस्यातून युवकावर अ‍ॅसीड हल्ला, उजवा डोळा झाला निकामी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून युवकावर चार ते पाच जणांनी अ‍ॅसीड हल्ला केल्याची घटना २१ पेâब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मिटमिटा परिसरातील शादाबनगर येथे घडली. अ‍ॅसीड हल्यात युवकाचा डोळा निकामी झाला असून जखमी झालेल्या युवकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवान फकीर मोहम्मद पठाण (वय ३९, रा.प्लॉट नं.४९, के.के.हौसींग सोसायटी, सरोश स्वूâलजवळ, मिटमिटा) असे अ‍ॅसीड हल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. रिजवान पठाण हा युवक कॉम्युटर दुरूस्तीचे काम करतो. दोन दिवसापुर्वी त्याला वडीलांनी बोलावल्यामुळे तो वडीलांच्या घरी गेला होता. त्यावेळी रिजवान पठाण याचे निसार शेख (वय ४८), मुज्जमील शेख, बिलाल शेख यांच्यासोबत आर्थिक देवाण-घ्ोवाणीच्या कारणावरून वाद झाला होता. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्यावर निसार शेख याने प्लास्टीकच्या मग मधुन आणलेले अ‍ॅसीड रिजवान पठाण याच्या तोंडावर टाकले. अ‍ॅसीडमुळे रिजवान पठाण याचे तोंड भाजल्याने त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान त्याचा उजवा डोळा निकामी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी रिजवान फकीर मोहम्मद पठाण याने दिलेल्या तक्रारीवरून मुज्जमील शेख, निसार शेख, बिलाल शेख व सोबतच्या दोन महिला असे पाच जणांविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग भागीले करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!