औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पळवुन नेणाऱ्या तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले. साहिल बाबा कुरेशी (२०) असे आरोपीचे नाव आहे.
प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानूसार, ४ ऑगस्ट रोजी फिर्यादी या पुजा करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी पीडिता ही घरी होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी या घरी परतल्या असता पीडिता घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरु असतांना ६ ऑगस्ट रोजी पीडिता ठाण्यात हजर झाली. तिने जबाब दिला की, फिर्यादी ही पीडितेचा मीत्र तथा आरोपी साहील याच्याशी लग्न करुन देत नव्हती. त्यामुळे ते दोघे पळुन खुलताबाद येथे गेले. तेथे दोन दिवस राहिल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे समजल्यानंतर पीडिता ठाण्यात आली. आरोपीला १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली. त्याला आजपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

