नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने लोकप्रीयतेच्या शिखरावर असणाऱ्या तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवड केली आणि मोदींच्या करिष्म्याने भाजपला सत्तेत आणले. तेव्हापासून म्हणजेच २०१४ पासून ते आजपर्यंत मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख चढताच होता. मात्र आज देश कोरोनाच्या संकटात असताना सरकारला परिस्थिती हाताळण्यात येत असलेल्या अपयशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शक्तिशाली नेता या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यात आलेल्या अपयशाने मोदी यांच्या ताकदवान नेता या गुणांकनात घट झाली असल्याचं दोन सर्वेक्षणांतून स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 25 दशलक्षचा आकडा ओलांडला आहे. या लाटेला सामोरं जाण्यासाठी मोदी सरकारने पुरेशी तयारी केली नव्हती हे स्पष्ट झालं. यामुळे मोदी समर्थकांमध्ये घट होऊ लागली आहे असं अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग मॉर्निंग कन्सल्टने म्हटलं आहे. ही कंपनी जागतिक नेत्यांसंदर्भात घडामोडींचा अभ्यास करत असते.
मोदींचं गुणांकन या आठवड्यात 63 टक्के एवढं आहे. ऑगस्ट 2019 पासून अमेरिकेची ही कंपनी मोदींच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या पाठीराख्यांचा अभ्यास करते आहे. एप्रिल महिन्यात मोदींच्या गुणांकनात 22 गुणांनी एवढी मोठी घट झाली. भारताच्या सी व्होटर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली आहे. मोदींच्या कामगिरीवर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांमध्ये घट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी मोदींच्या प्रदर्शनावर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांची संख्या 65 टक्के होती. ती आता 37 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- समुद्रातून १८४ जणांची सुटका करून INS कोची मुंबईत दाखल, २२ जणांचा मृत्यू
- मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला, राजीव सातवांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक
- शेतकऱ्यांच्या दट्ट्याने सरकार आलं वठणीवर; खुद्द मोदींनी खतांच्या किंमतीत घट केल्याचं केलं जाहीर !
- राज्यांमधील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर काटेकोर लक्ष ठेवा – पीयूष गोयल
- चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात लावावा- जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

