Share

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आनंद शिंदे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने ही दुखापत गंभीर नाही. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आनंद शिंदे हे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर आनंद शिंदे यांना इंदापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने आनंद शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही.

दरम्यान, आनंद शिंदे हे मराठी सिनेश्रुष्टीतील अग्रगण्य गायक आहेत. तसेच त्यांचे सुपुत्र आदर्श शिंदे हे सुद्धा नव्या पिढीतील उत्कृष्ठ गायक आहेत. आनंद शिंदे यांची गाणी ही खूप लोकप्रिय आहेत. कारण त्यांची आवाज आणि गायनाची शैली ही सगळ्यात हटके आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!