Share

‘बापू ! आमचे पद वाचवा’ पद गेलेल्या भाजप तालुकाध्यक्षांचे माजी मंत्री सुभाष देशमुखांना साकडे…

Published On: 

सोलापूर : पेशवाईच्या काळातील “काका मला वाचवा” हा प्रसंग खुप गाजला असून सर्वांनाच माहित आहे. नेमका असाच विडंबनात्मक प्रकार सोलापूर जिल्हा भाजप मध्ये घडला आहे. जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्षांना पदावरुन हटवल्याने त्यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना साकडे घालुन “बापू !आमची पदे वाचवा” असा टाहो फोडला आहे.

या संदर्भात सोमवार २४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवास्थानी एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी पदावरुन हटवलेल्या तालुकाध्यक्षांनी केल्यामुळे जिल्ह्याच्या भाजपमध्ये अंतर्गत राजकीय विस्फोट झाला आहे.

सोलापूर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी लोकमंगल ग्रुपचे शहाजी पवार यांनाच पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदाची संधी देण्याचा प्रयत्न माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. मात्र पक्षाच्या वाढीपेक्षा लोकमंगल ग्रुपचीच वाढ जास्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी त्या गटाला हादरा देत सांगोल्याचे श्रीकांत देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सांगोलेकर देशमुखांनी जिल्हा भाजपची सुत्रे हातात घेत पदाला चिटकून बसलेल्या जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्षांपदाची उचलबांगडी करत नवीन तालुका अध्यक्ष निवडीचे धोरण स्वीकारले. तालुक्यातील जवळपास ४ जुन्या तालुकाध्यक्षांची गच्छंती करत नव्या दमाच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी केल्या आहेत.

नुतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रियेच्या वेळी जिल्हाध्यक्षांनी त्यांना बैठकीला देखील बोलावले नाही. त्यामुळे पद गेल्याची हि बाब अनेकांच्या जिव्हारी लागली आहे. शिवाय त्यांनी यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी आम्हाला पद दिले आहे. या जिल्हाध्यक्षांना आमची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. पुढील तीन वर्षांसाठी आम्हीच तालुकाध्यक्ष आहोत अशा प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींना दिल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पद गेलेल्या या तालुकाध्यक्षांनी “बापू ! आमचे पद वाचवा” असे म्हणत माजी मंत्री सुभाष देशमुखांना साकडे घातले. या संदर्भात बापूंच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान जिल्हाध्यच आपल्याला नको, त्यांना तातडीने बदला अन्यथा सर्वांनी मिळून राजीनामे द्यायचे यावर एकमत झाल्याचे एका तालुकाध्यक्षाने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

सुभाष बापूंनी सांगितली माकडाची गोष्ट…

२४ ऑगस्टच्या बैठकीत जिल्हा भाजपमध्ये दुफळी निर्माण होत आहे. सांगोला, मोहोळ, माळशिरस, माढा आणि करमाळा या तालुक्यांमध्ये पक्षाचे नुकसान होणार आहे. भाजपाचे निष्ठावंत बाजूला पडतील, एकाच गटाचे काम प्रस्थापित होईल या मुद्यांचा उहापोह झाला. त्यानंतर सुभाष देशमुख यांनी पाण्यात पडलेल्या माकडाची गोष्ट सांगत “पाणी नाकापर्यंत येत नाही तोवर पिल्लू डोक्याच्या वर आणि पाणी नाकाच्या वर जायला लागले की पुढचं सर्वांना ठाऊक आहेच.” असे सांगत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.

तसेच कोणाचेही पद बदलले नाही, पूर्वी ज्यांच्याकडे जी पदे होती तीच राहतील, सर्वांनी भाजपाचे काम पूर्ण ताकदीनिशी व आक्रमक पणे करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या बैठकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील देखील उपस्थित होते. या संदर्भात सुभाष देशमुखांनी राज्याच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर या घडामोडी घातल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या काळात सोलापूर जिल्हा भाजप मध्ये पक्षांतर्गत रणसंग्राम पाहायला मिळू शकतो.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर सुरु!

नगर-पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले घोड धरण ओव्हर-फ्लो

आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील त्या आमदारांवर गुन्हे दाखल करा- खासदार सुजय विखे

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!