नागपूर : लॉकडाऊन काळात मोठय़ा संख्येने प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आणि गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात मुख्य भूमिका बजावणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे १६ पोलिस अधिकारी आणि त्यांच्या ४१७ कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरात कोरोनाचा शिरकाव होताच त्याला रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सुरक्षा कवचासारखी समोर झाली होती. लॉकडाऊनच्या त्या भयंकर दिवसात पोलिसांनीच शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. सोबतच गरजू लोकांच्या जेवणाचीही त्यांनी सर्वतोपरी जबाबदारी सांभाळली. स्वत:चा जीव धोक्यात घालून लढणार्या पोलिसांनाही कोरोनाने ग्रासणे सुरू केले होते. काहीचे जीवही यात गेले. तरीही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या पोलिसांनी कोरोनाशी लढणे सुरूच ठेवले. यामुळेच १६ अधिकारी कोरोना संक्रमित झाले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही कोरोनाच्या सावटात अडकले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. १९ पोलिसांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ३२३ लोकांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १२ जणांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ६० जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
‘शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण टिकवण्याबाबत शब्द द्यावा’
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर सुरु!
नगर-पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले घोड धरण ओव्हर-फ्लो

