Share

महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. मंत्रालयातील नगरविकास खात्यात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काल काढण्यात आल्या.

खुला प्रवर्ग सर्वसाधारणसाठी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली. खुला प्रवर्ग महिलांसाठी नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली आहेत.

महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या सर्वच नगरसेवकांना महापौर व्हायचे आहे. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. अडीच वर्षे महिलेला संधी दिल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाला महापौर पद देण्यात येणार असल्याचे समजते.

पुण्यात महापौर पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहेत. नगरसेविका मंजुषा नागपुरे, मंजुश्री खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, वर्षा तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे, राजाभाऊ लायगुडे, हेमंत रासणे, दिलीप वेडे पाटील, सुशील मेंगडे, दीपक पोटे, प्रसन्न जगताप यांच्याही नावाची महापौर पदासाठी चर्चेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1194931742097862656?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194931626305712128?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194929660796104704?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!