Share

औरंगाबादचे महापौर म्हणतात… महापालिकेचा आयुक्त कोण? हेच माहीत नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दीर्घ सुटी घेतल्यामुळे महापालिकेतील विकासकामे ठप्प झाली आहे. आकृतिबंध, विविध कामांच्या निविदांवर निर्णय होत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी थेट राज्यपालांनाच पत्र पाठवले आहे. डॉ. निपुण विनायक यांनी वाढीव सुट्यांसाठी अर्ज केल्यापासून महापालिकेचा आयुक्त कोण? हेच आम्हाला माहीत नाही. शहराला नियमित आयुक्त देण्याची मागणी महापौरांनी या पत्रात केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक वारंवार सुटीवर जातात. शहरात असले तरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच कारभार चालवितात. त्यामुळे महापालिकेत दांडीबहाद्दर अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेची निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर आलेली असताना मुख्यालयात मात्र शुकशुकाट दिसून येत आहे.

आयुक्त सुटीवर, अधिकाऱ्यांची दालने रिकामी असल्यामुळे कामे घेऊन आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून आयुक्त महापालिकेत नाहीत.

पंधरा दिवस सुट्टीवर असलेले आयुक्त रुजू होण्याऐवजी त्यांनी पुन्हा आठ दिवसांची रजा वाढवून घेतली. यामुळे महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महापौरांकडे अनेक नागरिक समस्या घेऊन येत आहेत, मात्र या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत.

आयुक्तच नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. डॉ. निपुण विनायक हे बदलीच्या प्रयत्नात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच ते रुजू होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते. आयुक्तांच्या वारंवारच्या सुट्यांमुळे त्रस्त झालेल्या महापौरांनी आता थेट राज्यपालांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्तांनी सुटी वाढविल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त कोण? असा प्रश्न सध्या पडला आहे. यापूर्वी प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार देण्यात आला होता.

आयुक्तांची शहरात राहण्याची इच्छा नसेल तर त्यांची बदली करावी व येथे कायमस्वरूपी आयुक्त द्यावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

महत्याच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1194855354640650240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194853785291505664?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194847641600851968?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!