जळगाव : महाराष्ट्र राज्यात शिंदे गट आणि शिवसेना गट अशी विभागणी झालेली पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे. अशातच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक-
दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाले आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांजवळचे आमदार चंद्रकात पाटील यांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळणार-
एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यापासून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून, यामध्ये कोणताही शेतकरी चुकणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहचवण्याचे काम केले जाणार असल्याचंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.
तसेच, राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की, हे सरकार घटनाबाह्य असून हे सरकार लवकरच कोसळेल. यावर देखील सत्तार यांना विचारलं असता ते म्हणाले की, विरोधकांना असं वाटणं साहजिकच आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis । मनोरंजन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी व्यवस्था निर्माण करणार – देवेंद्र फडणवीस
- Shivsena | गणराया, देश ‘निर्भय’ कर; शिवसेनेची प्रार्थना
- Shivsena | श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा- प्रतापराव जाधव
- Ganesh Chaturthi | ‘या’ गणेश उत्सवला तुमच्या लहान मुलांना दाखवा ‘हे’ चित्रपट
- Shahajibapu Patil | “अमोल मिटकरी नटून-थटून टिव्ही समोर येतात, दाढीला तेल लावतात अन्…” शहाजीबापू पाटील


