मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचे २७ ऑगस्टला निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. पाऊलो मायनो या दीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पाऊलो मायनो यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी दफनविधी करण्यात आला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
गेल्या महिन्यात 23 ऑगस्ट रोजीच सोनिया गांधी आजारी आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या. सध्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी वढेरा इटलीत आहेत. सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले – त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या काळात संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.
दरम्यान, राहुल आणि प्रियांका गेल्या काही वर्षांत अनेकवेळा त्यांच्या आजीला भेटायला जायचे. 2020 मध्ये राहुल गांधींना परदेश दौऱ्यांवरुन अनेकदा टीकेचा सामना करावा लागला होता. तेव्हा पक्षाने सांगितले होते की, ‘एका आजारी नातेवाईकाला’ भेटण्यासाठी इटलीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींना सततच्या विदेश दौऱ्यामुळे टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis । मनोरंजन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी व्यवस्था निर्माण करणार – देवेंद्र फडणवीस
- Shivsena | गणराया, देश ‘निर्भय’ कर; शिवसेनेची प्रार्थना
- Shivsena | श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा- प्रतापराव जाधव
- Ganesh Chaturthi | ‘या’ गणेश उत्सवला तुमच्या लहान मुलांना दाखवा ‘हे’ चित्रपट
- Shahajibapu Patil | “अमोल मिटकरी नटून-थटून टिव्ही समोर येतात, दाढीला तेल लावतात अन्…” शहाजीबापू पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

