टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं देखील यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्षाने आपली दुसरी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. यात एकून ७ उमेदवारांचा समावेश आहे. हे उमेदवार पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने पत्रकार, रिक्षाचालक, वकील, कोचिंग क्लासचालक अशा उमेदवारांचा समावेश आहे.
आपची दुसरी यादी
१. कैलास फुलारी – जालना (जालना)
२. नरेंद्र भांबवानी – मीरा रोड (ठाणे)
३. मुकुंद किर्दत – शिवाजी नगर (पुणे)
४. गणेश धमाले – बडगावंशरी (पुणे)
५. अॅड. खतीब वकील – मध्य सोलापूर (सोलापूर)
६. डॉ. सुनील गावित – नवापूर (नंदुरबार)
७. डॉ. अल्तामाश फैजी – मुंब्रा कळवा (ठाणे)
आपची पहिली यादी
१) विदर्भातील ब्रम्हपुरी – अॅड. पारोमित गोस्वामी
२) जोगेश्वरी पूर्व – विठ्ठल गोविंद लाड
३) कोल्हापूर करवीर – आनंद गुरव
४) नांदगाव (नाशिक) – विशाल वडघुले
५) कोथरूड – डॉ. अभिजित मोरे
६) चांदीवली – सिराज खान
७) दिंडोशी – दिलीप तावडे
८) पर्वती पुणे – संदीप सोनवणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
