🕒 1 min read
लखनऊ: शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लगेज बोगीमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला. या आगीनं पाहता पाहता रौद्र रुप धारण केलं होत. कोचला आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर लागलीच रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
सकाळी ७ च्या सुमारास दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या बोगीत आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मागच्या बाजूला असलेल्या जनरेटर आणि लगेज बोगीत ही आग लागली होती.
आग लागलेल्या बोगीला हटवून तत्काळ इतर बोगींना वेगळं करण्यात आलं रेल्वेला पुढच्या प्रवासासाठी जवळपास ८.२० मिनिटांनी रवाना करण्यात आलं या अगोदर १३ मार्च रोजी दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या सी – ५ कोचला आग लागली होती. या अपघातातही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र पुन्हा आठवड्याभरानंतर शताब्दी एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिलेशनशिपबद्दल कियारा अडवाणीचे मोठे वक्तव्य
- प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी
- सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी


