🕒 1 min read
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले आहे.
या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटातच राहुल गांधी या घोषणेच्या निमित्ताने प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी मोफत लसीकरणाच्या घोषणेबाबत प्रश्न उपस्थित करताना खाजगी हॉस्पिटलमध्ये आकारल्या जाणाऱ्या पैशांबाबत मोदी सरकारला विचारणा केली आहे. याआधीच सोमवारी सकाळी ट्विट करताना राहुल गांधी यांनी ब्ल्यू टीकवर प्रश्न केला होता.
राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधी मोफत लसीकरणाच्या निमित्ताने मोदी सरकारला एक प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणतात, ‘एक सोपा प्रश्न, जर सर्वांसाठी लस मोफत असेल, तर खाजगी रूग्णालयांमध्ये ही लस देण्यासाठी पैसे का आकारले जात आहेत ?’ असा सवाल त्यांनी केला. त्यांनी एकुणच खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
One simple question-
If vaccines are free for all, why should private hospitals charge for them? #FreeVaccineForAll
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार खासगी हॉस्पिटलला देशात उपलब्ध लसीपैकी एकुण २५ टक्के लस मिळणार आहे. पण या लसीची किंमत मोदी सरकारने आज जाहीर केली. खासगी हॉस्पिटलला एका लसीच्या डोससाठी अतिरिक्त १५० रूपये कमाल असे आकारता येतील. त्यामुळे ज्यांना लस विकत घ्यायची आहे, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध होईल, असे पंतप्रधानांनीही जाहीर केले होते. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासगी हॉस्पिटलच्या लसीच्या उपलब्धततेच्या निमित्ताने तसेच या हॉस्पिटलकडून आकारण्यात येणाऱ्या लसीच्या डोसच्या निमित्ताने केंद्रावर हल्लाबोल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पिरंगुट एमआयडीसी आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत करणार : अजित पवार
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
