औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात रिकाम्या मैदानात पडलेले दगड मौल्यवान असतील असे कोणाच्या मनातही आले नसेल. मात्र, या दगडांना चीन आणि गुजरातच्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतर खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड यांनी हा दगडांचा साठा जप्त करत संबंधिताला नोटीस बजावली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एमजीएम परिसरातील औरंगाबाद मेडिकलच्या मागील बाजूस माजी नगरसेवक अशरफ मोतीवाला यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारी मोकळ्या मैदानात विविध रंगाचे मौल्यवान दगड असल्याची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौणखनिज विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी याठिकाणी विविध रंगाचे मौल्यवान दगड (गौणखनिज) आढळून आले.
विशेष म्हणजे मोतीवाला यांच्या वडिलांच्या मालकीचे हर्सूल येथे सुद्धा जुन्या घरी मोठ्या प्रमाणात याप्रकारचे मौल्यवान गौण खनिज आढळून आले. याविषयी परवाना आणि अन्य माहिती मागितली असता संबंधित माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे गौण खनिज अधिकारी डॉ. दौड यांनी मोतीवाला यांना नोटीस दिली असून खरेदी विक्री बाबत माहिती देण्यास सांगितले आहे. यासाठी मोतीवाला यांना ६ दिवसाचा वेळ दिला असून वेळेत माहिती देऊ न शकल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या गौण खनिजाच्या किमती विषयी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी लाखो रुपये किंमतीचे हे गौणखनिज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना किंचित दिलासा : कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, तर नव्या कोरोना बाधितांची संख्या…
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता ? चंद्रकांत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर
- ‘भाजप ही वॉशिंग मशीन इथे डाकू पण साधू होतात’ ; राष्ट्रवादीचा टोला
- कोरोना नियमांचे उल्लंघन; आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

