नवी दिल्ली : तालिबानने दहशतवादी कारवाया करून अफगानिस्तानवर ताबा मिळवला. तालिबानच्या दहशतवादी कारवायांमुळे संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबानने युद्ध संपल्याची घोषणा केली आणि अमेरिकेने तालिबानला मोठा धक्का दिला आहे.
अमेरिकेतील बँकांमध्ये अफगाण सरकारचे कोट्यावधी डॉलर्स आहेत. ही रक्कम तालिबानच्या हाती पडू नये म्हणून अमेरिकेने अफगाणी सरकारची बँक खाती सील करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी हा निर्णय घेतला आहे.
जगातील सर्वात गरीब देशांमधील अफगाणिस्तान हा मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून होता. अफगाण सरकारची केंद्रीय बँक संपत्ती तालिबानला देण्यात येणार नसल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. ‘आम्ही अफगाणी नागरिकांच्या पाठिशी आहोत. आम्ही आमचा आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि मानवीय सहाय्यतेच्या दृष्टीकोनातून नेतृत्त्व करू,’ असे ज्यो बायडन म्हणाले होते. दरम्यान, अफगाण सरकारची बँक खाती सील करण्याच्या निर्णयावर अद्यापही व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, अफगाणिस्तानात ४०० अब्ज डॉलरचे लोहखनिज, २७० अब्ज डॉलरचे तांबे, २५ अब्ज डॉलरचे सोने, ५० अब्ज डॉलरचे कोबाल्टची खनिजसंपत्ती आहे. त्याचबरोबर अफगानिस्तानात जवळपास १६० कोटी बॅरल कच्चे तेल, १५ हजार ट्रिलियन क्युबिक फूटपेक्षा जास्त नैसर्गिक वायूचे साठेदेखील आहेत. याशिवाय दुर्मिळ धातूंचादेखील मोठा साठा आहे. या धातूंचा वापर आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन


