Share

दहावी निकालाची वेबसाईट डाऊन प्रकरणी पाच सदस्यीय समिती गठीत

Published On: 

मुंबई : परवा राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता.

या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शिक्षण विभागाचे आयुक्त, पुणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे प्रतिनिधी, उपसचिव (उद्योग), उद्योग उर्जा व कामगार विभाग,मंत्रालय, तांत्रिक सल्लागार, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,मंत्रालय,मुंबई, उपसंचालक (प्रशासन), आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय सचिव यांचा समोवश करण्यात आला आहे. या समितीने आपला अहवाल १५ दिवसात शासनास सादर करायाचा आहे

समिती या गोष्टीची करणार चौकशी :

  • निकालापूर्वी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी सर्व सबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती किंवा कसे?
  • निकाल घोषित करण्यासंबंधात राज्य मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?
  • संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधीत कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?
  • इयत्ता १० वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पूर्व तपासणी करण्यात आली होती का?
  • निकाल घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या सर्वरचा वापर करण्यात आला होता का?
  • भविष्यात अशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाय योजना सूचित करणे…
  • राज्यमंडळाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जबाबदार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!