Share

६३ मराठी कलाकार, ४० हून अधिक गाणी ‘आकपेला’ प्रकारातील गाणे सोशल मिडियावर व्हायरल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : एव्हीके एंटरटेन्मेंनट प्रस्तुत एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लोकप्रिय नाटकांचे निर्माते अमेय विनोद खोपकर हे नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात. अमेय विनोद खोपकर यांची निर्मितीसंस्था ‘एव्हीके एंटरटेन्मेंनट’ युट्यूब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांचा पहिला व्हिडीयो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीयोत ६३ कलाकार आणि ४३ गाण्यांचा समावेश आहे.

या व्हिडीयो चे वेगळेपण म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या गाण्यात मराठीसह हिंदीतील अनेक दिग्गज, अभिनेते,अभिनेत्री,गायक,संगीतकारांसह अनेक कलाकारांचा यात समावेश केला आहे. ‘आकपेला’ या प्रकारात कोणत्याही वाद्याविना गाणं यात केल जाते. कोणत्याही उपकरणांचा उपयोग न करता, तोंडाच्या माध्यमातून गाणं गायलं आहे. या गाण्यात सुरवातीपासून ते आतापर्यंतची हिट गाण्यांसह, काही फेमस डायलॉंगचा यात समावेश करण्यात आला आहे.

व्हिडीयोची सुरवात लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यापासून झाली असून, यानंतर नाच रे मोरा नाच, सांग सांग भोलानाथ, कोंबडी पळाली, नटसम्राटमधील डायलॉंग ‘कुणी घर देता का घर’,एकदंताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमही, धनंजय माने इथेच राहतात का?,ओम भट्ट स्वाहाः, टिक टिक वाजते डोक्यात,जीव दंगला रंगला असा, बाई वाड्यावर या, मी रात टाकली मी कात टाकली,नमस्कार आजच्या ठळक बातम्या, मला जाऊ द्याना घरी आता वाजले कि बारा, चला हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या डोक्याला शाॅट नको हवा येऊ द्या, लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी अशी विविध गाणी यात आहे.

हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, वैशाली सामंत,सुदेश भोसले आदींसह अनेक दिग्गज आणि बहुचर्चित कलाकार यात आहे. हे गाणं रुपाली मोघे आणि श्याम्प्रद भामरे यांनी कम्पोज केलं आहे.तर राहुल भटनागर यांनी गाणं एडीट केलं असून या गाण्याची फोटोग्राफी निखील गुलहाने यांनी केलं आहे. या गाण्याची कन्सेप्ट आणि दिग्दर्शन विनय प्रतापराव देशमुख यांची आहे. सोशल मिडियावर या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Sony- सोनी चा नवीन “ए १ ओएलईडी” टिव्ही

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!