मुंबई : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवण्याबाबत मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांच्या समवेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
इस्त्रायलमध्ये झालेल्या जलक्रांतीच्या धर्तीवर मराठवाड्यात त्यापद्धतची यंत्रणा राबवता येईल का याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली तसेच एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्याबाबतही निर्णय झाला
जलसंपदा विभागाचे सचिव घाणेकर, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक डॉ. एन. व्ही. शिंदे व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच इस्त्राईलचे प्रतिनिधी म्हणून याकोव, निलरोड कलमार,अनय जोगलेकर, डिगो बर्जर,जलसंपदा विभागाचे कपोले, बेलसरे उपस्थित होते.
‘ऑपरेशन कमळ’ फसले; पुन्हा शिवसेनेचा सामनातून भाजपावर निशाणा
भाजपा खासदार-आमदारामध्येच एकमत नाही; पडळकरांनी केली संजय पाटलांवरच टीका
‘उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने राजीनामा द्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

