पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली.
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत.
याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान,एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली होती. पडळकर आणि सहकाऱ्यांना रात्री अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
- … अन्यथा नाईलाजाने कडक निर्णय घ्यावे लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- चिंताजनक! सातारा डोंगराला पुन्हा आग
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ, नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू
- परभणीमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

