ठाणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार, तर घरगुतीकरिता दोन फुटांची गणेश मूर्ती असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत मात्र ही सूचना दिली असतानासुद्धा सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना चार फुटांची, तर घरांमध्ये दोन फुटांपर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी, अशी मर्यादा शासनाने घालून दिली आहे. तसे असतानाही मेहरुण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे हा मूर्तिकार सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना गुरुवारी रात्री मिळाली. साडेदहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण गाठले. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती गणेशमूर्ती विक्री करताना दिसून आली.
दुकानात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सहा गणेश मूर्ती सहा फुटांच्या आढळून आल्या, तर मूर्तिकाराचे नाव विचारले असता, त्याने चंद्रकांत वरणे (वय ३८) असे सांगितले. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केले म्हणून मूर्तिकाराविरुद्ध पोलीस कर्मचारी मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

