नागपूर : ‘आपणास आधी कळविल्या प्रमाणे मी कोविड पोसिटीव्ह असल्याने सावंगी रुग्णालयात दाखल झालो होतो, मागील ७ दिवस सावंगी रुग्णालयात मला उत्तम उपचार मिळाला व माझ्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे’, असे सांगून मतदारांशी संवाद साधणाऱ्या वर्ध्याचे आमदारांना मुंबईला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यामुळे वर्धावासियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे डॉ. पंकज भोयर यांनी सावंगी रुग्णालयातील डॉक्टर्स, सर्व कर्मचारी व विशेष करून रुग्णालयायील निर्भीड, सेवाभावी परिचारिका व सफाई कर्मचारी यांचे काल मनापासून आभार मानले होते. त्यांच्या धैर्याला सलाम करतो असे देखील पंकज भोयर म्हणाले होते. मग अचानक मुंबईला हलविण्याची गरज का पडली असाही प्रश्न नागरीकांना पडला आहे.
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जातीचा दाखला खोटा, शिवसेना नेत्यानेच केला आरोप
मागील एक महिपासून डॉ. पंकज भोयर यांना गळ्याचे इन्फेक्शन झाले होते. हे इंफेक्शन जाण्यास वेळ लागेल असे देखील डॉक्टरांचे म्हणणे होते. हे इन्फेकॅशन तातडीने दूर होऊन मला आपल्या सेवेत हजर होता यावे या उद्धेशाने पुढील उपचाराकरीता मुंबई येथील रूग्णालयात दाखल होतो असल्याचे डॉ. भोयर यानी म्हंटले आहे.
मुंबईला जाण्यासाठी निघतांना स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले. कोरोनापासून बचावाचे सर्व नियम काटेकोर पणे पाळावे. आपण सर्व सुरक्षित राहावे असे ते म्हणाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचं : गुणरत्न सदावर्ते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

