सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. गेले काही दिवस या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये खटके उडत असून याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होऊन त्याचे पडसाद राज्य पातळीवर देखील उमटू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळचेपीमुळे शिवसेनेच्या संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मोठी राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली होती. आता, मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा जातीचा दाखला खोटा असल्याचा आरोप शिवसेनेच्याच नेत्याने केला आहे.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला खोटा आणि बनावट असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. बनावट आणि खोटी कागपत्र तयार करुन माने यांनी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली आहे, असं सोमेश क्षीरसागर म्हणाले आहेत. याप्रकरणी त्यांनी यशवंत माने यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचं : गुणरत्न सदावर्ते

