औरंगाबाद : आरोग्य विभाग गट (क) (ड) चे निकाल स्थगित करून नव्याने परिक्षा घ्यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh tope) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आत्तापर्यंत आरोग्य भरतीत झालेला घोळ, पेपरफुटी इत्यादी गोष्टी पाहता परिक्षा नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग गट क व ड च्या झालेल्या लेखी परिक्षा स्थगित करून नव्याने प्रक्रीया राबविण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन परीक्षा नव्याने घेण्याची मागणी केली आहे. कारण परिक्षेत पेपर फुटीचे प्रकरण व प्रश्नपत्रिका देखील फुटल्याने तसेच हाॅल तिकिटमध्येही वारंवार बदल झाल्याने उमेदवारांची मानसिकता अस्थिर झालेली होती. त्याचा परिणाम परीक्षार्थींवर झाला. तसेच, आरोग्य विभागाच्या परिक्षेमध्ये झालेल्या सावळा गोंधळ याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. असे असतांना परिक्षेच्या निकाल लावण्याची घाई करू नये.
अनेक ठिकाणी पेपर उशिरा आले आहे. त्यातच गट क ची परिक्षा असतांना ड चा पेपर मिळाला. तर काही प्रश्नपत्रिका अर्धा तास उशीरा मिळाली. अशाप्रकारे या परिक्षा प्रक्रियेमध्येच मोठा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या मुलावर अन्याय होऊनही परिक्षेचा निकाल लावण्याची घाई केली जात असेल तर आरोग्य विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या परिक्षा पुन्हा घेऊन नि:पक्षपाती निकाल लावावा. तसेच न्यासा या संस्थेचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकावे. या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील
- ‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’
- औरंगाबादेत जिन्सी प्रकरण रंगले; आजी-माजी प्रशासकांचा पलटवार!
- ‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

