Share

शिवरायांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? डोंबिवलीत 14 वर्षीय मुलीवर तब्बल 31 जणांनी केला अत्याचार

Published On: 

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेतकी नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर किमान 15 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातूनही हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीवर गँगरेप झाल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात समोर आली आहे. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर 31 जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात तब्बल 31 जण आरोपी असल्याची माहिती आहे. यापैकी 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!