Share

‘रिषभ, तू धोनी बनण्याचा प्रयत्न करून नकोस’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थित रिषभ पंत सध्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याने सुरुवातीला चांगला खेळ केला परंतु सध्या त्याची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होताना दिसत आहे.

याविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्टने भाष्य केले आहे. त्याने मी कोणत्याही खेळाडूंची तुलना करण्यात विश्वास ठेवत नाही. मला असं वाटतं की, भारतीय चाहत्यांनी पंतची तुलना एमएस धोनीबरोबर करणे टाळावे. धोनीने आपली प्रतिमा अगोदरच मोठी केली आहे. तिथपर्यंत एकदिवस कोणीतरी पोहचेल पण कदाचित हे संभव नाही असं विधान केले आहे.

पुढे बोलताना त्याने ‘मी रिषभ पंतला सल्ला देईल की तुला जितकं जमेल तितकं तू धोनीकडून शिकून घे. पण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नको. तूला जमेल तेवढा सर्वोत्तम रिषभ पंत म्हणून ओळख बनवं असा सल्ला दिला आहे. तसेच त्याला फलंदाजीविषयी सल्ला दिला आहे.

दरम्यान, अॅडम गिलक्रिस्टने रिषभ पंत हा एक प्रतिभाशाली युवा फलंदाज आहे. त्याच्यावर इतक्या लवकर एवढा दबाव टाकू नये आणि त्याने प्रत्येक सामन्यात धोनीसारखी कामगिरी करावी अशी अपेक्षाही करायला नको असं चाहत्यांना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192016590604161025?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192013828243935234?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192010896161177600?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!