Share

पिकांच्या नुकसानीची भरपाईसाठी, शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

केज : तालुक्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील शेतातील पिके हातची गेली, तर रब्बी हंगामात पावसामुळे शेतात पेरणी करता न आल्याने ही पिके येण्याची शाश्वती देता येत नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता. पाच) तहसील कार्यालयासमोर सकाळी अकराच्या सुमारास बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात परतीच्या पावसाने शेतातील काढणीस आलेल्या खरिपातील सोयाबीन, मका, बाजरी व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पेरणी करण्याचा कालावधी निघून गेला आहे. परतीचा जोराचा पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. शेतीतील नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे रत्नाकर शिंदे, अरविंद थोरात, अनिल बडे, अशोक जाधव, विकास काशीद, विद्यार्थी सेनेचे अनिल ठोंबरे, तात्यासाहेब रोडे, अभिषेक घाटूळ, महाराणा घोळवे, जाहेद शेख, नारायण तांदळे, राहुल घोळवे व शंकरसिंग गोखे हे शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दुलाजी मेंडके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191959558593359872?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191958428966670336?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191955026178117634?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!