🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतदानावेळी काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महायुतीने जोरदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. राज्यात भाजपने ७० तर शिवसेनेने ४५ जागेवर मुसंडी मारली असल्याचे सुरुवातीचे कल हाती येत आहेत.मुंबईतील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल हाती येत आहेत. तर पुण्यात देखील सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे वैभव नाईक,दीपक केसरकर,एकनाथ शिंदे आघाडीवर असून सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुरेश माने यांच्यात वरळीत प्रमुख लढत होणार आहे. तर ‘मराठी बिग बॉस’फेम अभिजित बिचुकलेही इथून मैदानात उतरलेत.याठिकाणी आदित्य ठाकरे मोठ्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर कणकवलीत नितेश राणे ७०० मतांनी आघाडीवर आहेत.
288 जागांकरता मुंबई, ठाणे,पालघरसह महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदाराचा निरूत्साहच पाहायला मिळाला. मुंबईत फक्त 58.49 टक्के मतदान झाले. मुंबईबरोबरच यंदा सगळ्यांचे लक्ष हे ठाणे-पालघर विधानसभेकडे देखील लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचा गड राखणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या जागा वाढविणार की घसरणार? मनसेचं खातं उघडणार का? वंचितचं काय होणार? यासगळ्यांची प्रतिक्षा आता थोड्यात वेळात संपणार आहे. या निकालांचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार असून निकालाची क्षणाक्षणाची बित्तमबातमी तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1187207812708888576?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
