Share

मराठवाड्यासह प. महाराष्ट्रात पावसाचा धडाका सुरूच, जालन्यातील कुंडलिका नदीला आला पूर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- जालना जिल्ह्यात 49 मिलीमीटर पाऊस झाला असून 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या वर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस झाला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे जालना शहरातल्या कुंडलिका नदीला पूर आला असून, नदीवरील रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे.

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण भारतातील हवामान देखील चांगलंच पावसाळी बनलं आहे. केरळमधील एर्नाकुलम आणि कोचि, तर तमिळनाडुतील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडला.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असल्यानं हा पाउस पडतो आहे. निलगिरी, कोईमतूर, थेनी, तंजावूर, नागपट्टीणम्, तिरुवारुर आणि रामनाडपुरम इथं पुढील चोवीस तासात अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यात माणगंगा, अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. या दोन्ही नद्यांना गेल्या पन्नास वर्षात प्रथमच एवढा मोठा पूर आला आहे. त्यामुळे आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, जत तालुक्यातील प्रमुख रस्ते रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शेतातील उभ्या पिकात पाणी साचून राहिल्यामुळे खरिपाचे पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुणेकरांना गेल्या चार दिवसांपासून पावसानं चिंब केलं आहे. त्यामुळे दिवाळीच्या तयारीवर चांगलंच पाणी पडतं आहे. उघडीप पाहून खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अचानक पावसाच्या सरी गाठतात आणि तारांबळ उडते. अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवरुन वाहनांसोबत पाण्याचीही वाहतूक सुरु होते. तिकडे केरळमध्ये एर्नाकुलम आणि कोचि जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे, त्यामुळे दिवाळीच्या सुटीत केरळला जाऊ इच्छिणाऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे.

पुणे आणि परिसरात आज ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1186906534581653505?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1186908108360056832?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!