Share

क्रिकेटपटूंसाठी खास हँडबुक

Published On: 

वेब टीम ;बीसीसीआयकडून आपल्या सर्व खेळाडूंसाठी एक नवीन पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. हे पुस्तक एक विशेष हँडबुक आहे ज्यात अनेक गोष्टींचा लेखा जोखा मांडण्यात आला आहे . क्रिकेटर्सला खेळ तसेच खेळामुळे येणाऱ्या तणावापासून ते क्रिकेटमधून मिळणारा पैसा या सर्व गोष्टींचा उहापोह या पुस्तकात मांडण्यात आला आहे . सर्व क्रिकेटर्स या पुस्तकाचा लाभ घेता येणार आहे.

बीसीसीआयने आज या पुस्तकाचे औपचारिक उद्घाटन केले. ‘१०० थिंग्स एव्हरी प्रोफेशनल क्रिकेटर मस्ट नो’ असे नाव असलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडने लिहली आहे. हे पुस्तक बीसीसीआय बरोबर करारबद्ध असलेल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध असणार आहे. या पुस्तकात खेळाडूंसाठी येणाऱ्या रकमेच्या व्यवस्थापनापासून ते अगदी दुखापतीला कसे सामोरे जायचे असे १० विभाग आहेत.

हे २१२ पानी पुस्तक बीसीसीआयने प्रथमच प्रकाशित केले आहे. राहुल द्रविड यावेळी बोलताना म्हणाला, “पुस्तक वेळोवेळी संदर्भ म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे. अनेक विषय यात चांगल्या पद्धतीने मांडले आहेत ज्यामुळे नवोदित आणि तरुण खेळडूंना याचा चांगला फायदा होईल.”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!