🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : देशात आर्थिक मंदी वाढत असल्याने देशासह राज्यातही याचे परिणाम होताना दिसत आहेत. बेरोजगारी, बंद पडत चालेले उद्योगधंदे, बँकातील घोटाळे आदींमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. मात्र ” पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो गेल्या पाच वर्षांत आम्ही पहिल्या क्रमांकावर आणला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राज्यच सकल उत्पन्न आधी १६ लाख कोटी रुपये होतं आज त्यात वाढ होऊन २६ लाख कोटी झालं आहे. भाजप सरकारने राज्याच्या तिजोरीत दहा लाख कोटी रुपयांची भर टाकली आहे. मागील पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र शिक्षणात अठराव्या क्रमांकावर होता आज तो आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्यात आम्हाला यश आले आहे. आरोग्यात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता तो तिसऱ्या क्रमांकावर आणला. उद्योगात महाराष्ट्र मागे गेला होता तो पहिल्या क्रमांकावर आणला. गुंतवणूकीत आणि रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो ही पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आमच्या सरकारनं केलं आहे.” असे स्पष्टीकरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
तर पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील जनतेची केवळ दिशाभूल केली. गेल्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेच्या सर्व समस्या सोडवल्या असा दावा करणार नाही. मात्र, पंधरा वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट कामं केली आहेत, हा दावा आम्ही निश्चित करु शकतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182251968263159808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182252698013323264?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
