Share

प्रचारसभा रस्त्यावर घेण्याची परवानगी द्यावी, मनसेचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील पहिल्या प्रचारसभेला विघ्न आल्याने मनसेने आता रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्या अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अवकाळी पडण्याऱ्या पावसामुळे मैदानांवर चिखल होत असल्याने सभा रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रचारसभा या रस्त्यावर घेण्याची परवानगी मिळावी, असे पत्र मनसेने लिहिले आहे.

राज ठाकरेंची काल पुण्यातील कसबा पेठेत सभा होती. मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यानं ही सभा रद्द करावी लागली. त्यामुळे राज ठाकरेंच्या पहिल्या सभेलाचं विघ्न आल्याने मनसेने आता रस्त्यावर सभा घेण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मैदानं आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र पावसामुळे मैदानांमध्ये पाणी साचत असल्यानं मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत.

दरम्यान पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आज राज ठाकरे सांताक्रूझ येथे पहिली सभा घेणार आहेत. तर दुसरी सभा घाटकोपर येथे घेणार आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तोफ धडाडणार आहे. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत कोणत्या मुद्यांना हात घालणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182249296177090561?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182247172907159552?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182242409020706817?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!