Share

विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली,अजितदादांनी शिंदेंना लगावला टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दोन दशकांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेचं कारण ठरलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेंनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचं केलेलं भाकीत .अवघ्या काही दिवसांवर राज्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याबद्दल विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशात प्रचाराची रणधुमाळीदेखील सुरू झाली आहे. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बोलून दाखवतील. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत असं आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे हे स्वतः थकले आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकले असल्याचं म्हटलं पण काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय कधीही थकणार नाहीत असे पक्ष आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181871109106364416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181871309682139136?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!