Share

‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अशाच एका प्रचारसभेत बोलताना माकपचे सोलापूर मध्य मतदारसंघाचे उमेदवार नरसय्या आडाम यांची जीभ घसरलेली पाहायला मिळाली. त्यांनी विरोधी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

नरसय्या आडम यांनी महाराष्ट्रात माझ्या एवढ्या केसेस कोणाच्या अंगावर आहे तर दाखवा. तुमच्यावर ५ केस पडल्या तर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, जो माणूस पंतप्रधानांना इथं आणू शकतो तो काहीही करु शकतो असं विधान आडम यांनी केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी मी सांगतो, सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर १७५ गुन्हे वाढले, २०० केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी चोरी, डाका, फसवणूक या केसेस नाही तर परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत. हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सोलापूर मध्यमधून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि माकपचे नरसय्या आडम यांच्यात सामना होत आहे. तसेच येथून राष्ट्रवादीच्या जुबेर बागवान यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181805148063948800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181799983156092928?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!