🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. बुधवारी ९ ऑक्टोबर राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. बुधवारी मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेच्या निमित्ताने मनसेच्या प्रचारालाही सुरुवात होणार आहे.
तसेच पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.
यांनतर मनसेने बुधवारी (९ ऑक्टोबर) सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानासाठी मनसेकडून अर्ज करण्यात आला होता. ही सभा अलका टॉकीज चौकात घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पुणे शहर आयुक्तांकडे केली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य पहायला मिळाले. तसेच कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडून देखील पाटील यांना घेरण्यासाठी तिरकी चाल खेळण्यात आली. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443943717720065?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443530561994753?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181430112878780416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
