Share

राष्ट्रीय शाश्वात शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय शाश्वात शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास असे या योजनेचे नाव आहे. सन 2014-15 साली योजना सुरु करण्यात आली आहे. तालुका स्तरावरून संबंधित लाभार्थ्याच्या बँक खाती रक्कम जमा होते .

शेतक-यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजिविकेच्या साधनांची उपलब्धता करणे व त्याआधारे त्यांचे जीवनमान उंचावणे, निरनिराळ्या एकात्मिक शेती पध्दतींचा अवलंब करून दुष्काळ, पूर व हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान टाळणे, अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि उत्पादन वाढविणे व शाश्वात रोजगार उपलब्ध करणे, कोरडवाहू क्षेत्रातील कृषि उत्पादनातील जोखीम कमी करून शेतक-यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे असे या योजनेचे उद्देश आहे.

सर्व प्रवर्गासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या क्षेत्राची निवड आवश्यक. प्रत्येक उपविभागातून दोन प्रकल्पांची निवड, प्रकल्प क्षेत्र शक्यता े एकाच गावात. परंतु अपवादात्मक परिस्थितीत प्रकल्पासाठी लगतच्या दोन त े तीन गावांची निवड, ज्या गावामध्य े यापूर्वी कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रम (RADP), कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) व कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम, या योजना राबविण्यात आलेल्या आहेत अशा गावांची निवड करण्यात येत नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी आहे.

तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सर्व असे संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता आहे. कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) घटकांतर्गत प्रत्येक शेतकरी कुटुंबास 2 हेक्टर च्या मर्यादेत रू.1,00,000/- पर्यंत अनुदान देय आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178544737348812800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178541711980548097?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178538296072228864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!