Share

जेव्हा भाऊ भावला गोळ्या घालतो त्याला कौटुंबिक कलह म्हणतात, आव्हाडांचा भाजपला टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पवारांच्या घरात कोणताही गृह कलह नाही. जेव्हा भाऊ भावला गोळ्या घालतो त्याला कौटुंबिक कलह असल्याच मानलं जात, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे. आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि त्यांचा भाऊ प्रविण महाजन यांच्या प्रकरणावर भाष्य करत भाजपला लक्ष्य केलं. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यनंतर पवारांच्या घरात कलह सुरु असल्याच बोललं जात होत. यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमचा घरसंसार एक आहे. कुणी उगाच हे गृहकलहामुळे झालं असं म्हणत ओरडत आहे. भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात. बाकी गृहकलह नसतो. असं असलं तरीही आम्ही यातही कधी पडलो नाही. जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला लगावला आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून मारले होते. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी कौटुंबिक कलहाची व्याख्या स्पष्ट केली.

दरम्यान आज अजित पवार यांचे राजीनामा सत्र चांगलेचं गाजले. यावर खुद्द अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले. शुक्रवारी सायंकाळी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरवात झाली होती. या चर्चांमध्ये कौटुंबिक कलह हा मुद्दा मात्र सारखा चर्चेत राहिला होता. यावर अजित पवार यांनी कोणतेही कलह नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनीही यावर भाष्य करत भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1177933815626420225?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177927238664146945?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177927061995839488?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!