🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाची बोलणी अद्याप सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. परंतु अजूनही युतीबाबत ठोस निर्णय न इच्छुक संभ्रमात आहेत. आज शिवसेनेकडून मुंबईमध्ये राज्यातील पदाधिकारी व इच्छुकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजप – शिवसेना युतीचे जागा वाटप शेवटच्या टप्यात आल्याचं बोलले जात आहे. पाच ते सहा जागांचा तिढा अद्याप कायम असल्याने घोषणा होत नसल्याचं दोन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत. यामध्ये आज शिवसेनेकडून सर्व तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख व इच्छुकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.
निवडणुकी संदर्भात दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. यावेळी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, मात्र तरीही दोन्ही पक्षातील नेते अधिकृतपणे बोलत नाहीयेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे आजच्या शिवसेना मेळाव्यात काय चर्चा होणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177807226402041856?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177806465534287873?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177805717840859136?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
