Share

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान नाव उलटली, ११ जणांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारे बाप्पा त्याच्या गावी गेले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर ते परत गेले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यासह देशात सगळीकडे विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. विसर्जन करताना नाव तलावात उलटून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. भोपाळ येथील खटलापुरा घाट परिसरात ही घटना घडली आहे. घटनास्थळावर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गणपती विसर्जन करण्यासाठी नावेत एकूण १९ जण स्वार होते. तलावात अचानक वाढलेले पाणी आणि नावेत अधिक संख्येने असलेले लोक. यामुळे नावेचा तोल जाऊन ती हेलखावे खाऊ लागली. नावेतील लोकांचा गोंधळ आणि हालचाल यांमुळे नाव अधिकच हालू लागली. अखेर नाव तलावातील पाण्यात उलटली. राज्य सरकारने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, राज्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. राज्यातील विविध घटनांमध्ये ८ गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात मुंबई, पुणे, सातारा, अहमदनगर, वर्धा या ठिकाणच्या घटनांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!