🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : फडणवीस आणि त्यांचे साथीदार राज्य विकायला निघाले आहेत. गड किल्ले भाड्याने देतायत. असा निर्णय घेताना लाज वाटली पाहिजे, अशी टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस हा निर्णय राबवू देणार तर नाहीच पण दोन महिन्यात आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय कच-याच्या डब्यात टाकू, असंही पटोले म्हणाले आहेत.
राज्य विकायला निघालेत फडणवीस आणि साथीदार. गड किल्ले भाड्याने देतायत. लाज वाटली पाहिजे असा निर्णय घेताना.
काँग्रेस हा निर्णय राबवू देणार तर नाहीच पण दोन महिन्यात आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय कच-याच्या डब्यात टाकू pic.twitter.com/A64ijFEft0
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 6, 2019
राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाला गडप्रेमी आणि विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर… pic.twitter.com/rxNLbEgEQM
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 6, 2019
सरकारच्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे. असं मत सुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या @CMOMaharashtra
आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे.— Supriya Sule (@supriya_sule) September 6, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
