Share

नारायण राणे भाजप प्रवेश करणार ? मुख्यमंत्री म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर धुळे येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणेंना त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करायचा असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंवरील कारवाई सर्वस्वी ईडीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची केलेली पाठराखण सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसेच मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणले, शिवेंद्रसिंहराजे भाजपात आले आहेत. तसेच उदयनराजे भाजपात आले तर आम्हांला आनंदचं होईल असे म्हणत उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच छत्रपतींच्या घराण्यातील या तेराव्या पिढीचे ते वंशज आहेत, या देशामध्ये छत्रपतींचा जो मान आहे हा फार मोठा आहे त्यामुळे ते आले तर आम्हांला आनंदचं होईल.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे भाजप- सेना बळकट होत आहे मात्र आघाडीमध्ये पक्षांतरामुळे पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!