🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने कलम ३७० हटवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या निर्णयाचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेतही उमटले होते. अशातच भारताचा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशात दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्याचा कट असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्लीसह १५ शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरांवर दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अशांत वातावरण आहे त्यामुळे तेथील परिस्थितीवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याने नौदलालाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून समुद्री जिहादाचा कट रचला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे.
मुस्लीम बांधवांचा ऐतिहासिक निर्णय, ‘ईद’ला बकरी न कापता पूरग्रस्तांना करणार मदत
मदतीचा ओघ सुरू : पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेच्या १०८ कर्मचाऱ्यांचं पथक रवाना
बजरंगाची कमाल : तबलिसी ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत पटकावले सुवर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

