🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून प्रशासनाने मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र ही मदत करताना भाजप सरकारने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. यावरून विरोधकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आघाडी मारली होती. मात्र आता स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीची गत झाली आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाने देखील पूरग्रस्त भागात मदत म्हणून देणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो टाकले आहेत.
या फोटोवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे फोटो खोटे असल्याचा दावा केला होता. त्यांनी भाजपच्या आय टी सेलकडून जयंत पाटील यांचा बनावट फोटो व्हायरल केला असल्याचे राष्ट्रवादी पक्षाकडून सांगितले जात आहे. तसेच हे कट- कारस्थान भाजपचेचं असल्याचा आरोप केला आहे. परंतु आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
खुद्द जयंत पाटील यांनी खाद्यपदार्थांसाठी आधीच छापलेले जुने बॉक्स वापरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी ‘एक ऑगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध शाळांत वाटण्यासाठी खाऊचे बॉक्स तयार करण्यात आले होते. चार तारखेपासून पुराची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. त्यावेळी आम्हाला कुठेही बॉक्स आणि पॅकिंगसाठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले असं जयंत पाटलांनी काबुल केले आहे.
दिनांक १ ऑगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध शाळांत वाटण्यासाठी खाऊचे बॉक्स तयार करण्यात आले होते. ४ तारखेपासून पुराची हि दुर्दैवी परिस्थिती उद्भवली.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 10, 2019
या पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंग साठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही. अजूनही आम्हाला बॉक्सची कमतरता आहे तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी बॉक्स व पॅकिंग मटेरियल पाठवावे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 10, 2019
दरम्यान, सरकारकडून देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात आले आहेत. तसेच, स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सरकारच्या या जाहिरातबाजीचा सामान्य नागरिकांनी देखील निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘पूरग्रस्तांना मदत करताना जाहिरातबाजी करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार’
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन हळूहळू येतंय पूर्वपदावर
‘काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘मायलेकांची गुलामीच’ करत राहणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

