Share

जाणून घ्या मकरंद अनासपुरे यांनी का घेतली पोलीसात धाव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्राचा वापर करून सोशल मीडियावर वादग्रस्त राजकीय मते त्यांच्या नावानी पोस्ट होत आहेत. या खोट्या मतांमुळे त्यांची चुकीची प्रतिमा जनतेमध्ये पसरली जात आहे. या प्रकारा विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

मागील सहा ते आठ महिन्या पासून अशा कमेंट्स व्हायरल होत आहेत. यासाठी मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमातील छायाचित्रांशी छेडछाड करून ती वापरली जात आहेत . अनासपुरे हे फेसबुक चा वापर करता नसल्याने या कमेंट्स बाबत त्यांना इतरांन कडून माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार नोंदवली आहे.

याबाबत मकरंद अनासपुरे म्हणाले की,  कोणताही संदर्भ नसलेली राजकीय मते मी मांडलेली नाहीत. माझ्या छायाचित्रांचा वापर करण्यात आलेला आहे. विनोदापर्यंत कमेंट ठीक आहेत. मात्र राजकीय मते मला नकोत. माझ्या अनुमतीशिवाय कमेंट करण्यात आलेल्या असून यामुळे विनाकारण राजकीय भूमिका तयार होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. वेगळा संदेश जाऊ नये यासाठी मी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!