Share

कॉंग्रेसला बळ आणण्यासाठी बाळासाहेब थोरात घेणार विभागीय बैठका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजप-सेना युतीला शह देण्यासाठी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा घाट घातला आहे. लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदर मोर्चेबांधणी केली आहे. तर राज्यात पुन्हा कॉंग्रेसला बळ आणण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विभागनिहाय बैठका घेणार आहेत. या बैठकांचे वेळापत्रक कॉंग्रेसने जाहीर केले आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात गुरुवारी नवी मुंबई, कोकण विभागाची बैठक घेणार आहेत. तर शुक्रवारी नाशिक विभागाची बैठक होणार आहे. तसेच शनिवारी पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकींना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची मतदारसंघातील स्थिती, यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला उभारी आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील महाराष्ट्र दौरा काढणार आहेत. कॉंग्रेसच्या या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी अध्यक्ष सहभागी होणार आहेत. तसेच ऑगस्टमध्ये ही यात्रा निघणार असून पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सभा, मेळावे, बैठका घेऊन थोरात हे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!