Share

आघाडीचं २०० जागांचं ठरलं, ८८ जागांसाठी रंगणार चर्चेच गुऱ्हाळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २०० जागांवर एकमत झाले आहे. पुढील चर्चा करण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी मुंबईत दोन्ही पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, तर राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती असणार आहे.

तेवढ्याच जागा राष्ट्रवादीच्याही अंतिम होत आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ८८ जागांसाठी मित्रपक्षांशी काय बोलणी करायची यावरही १६ तारखेला चर्चा होईल, असेही चव्हाण म्हणाले. आमच्या मुलाखती घेण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, पण आत्ताच काही बोलणे योग्य नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!