टीम महाराष्ट्र देशा : पंढरपुरात चार मोठ्या यात्रान दरम्यान प्रचंड गर्दी असते. आता आषाढीच्या वारीने लाखो वारकरी पंढरपुरात येतात. त्यामुळे पंढरपुरातील बाजारपेठा सज्ज आहे. वारकरी पंढरपुरात आले म्हणजे नव्याने टाळ घेण आलं तर तुळशी माळ घेण्यापर्यंत खरेदी होते. या खरेदीतील वस्तू म्हणजे वारकऱ्यांची सौंदर्य लक्षण ! त्यात दारी तुळस आणि गळ्यात तुळशी माळ म्हणजे वारकरी असं म्हणलं जात. गळ्यात तुळशी माळ घालूनच स्वता: पांढूरंग सगळ्या समक्ष उभा आहे. त्यामुळे ही तुळशी माळ वारकऱ्यांना सुद्धा प्रिय आहे.
असं सागितलं जात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठविला तो परत पाठवताना तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून पाठविला आम्ही तेणे सुखी | म्हणा विठल विठल मुखी || येर तुमचे वित्तधन | ते मज मृत्तिकेसमान || कंठी मिरवा तुळशी | व्रत करा एकादशी || यातील कंठी मिरवा तुळशी हा बोध फार महत्वाचा आहे. तुळशीची माळ अभिमानानी गळ्यात मिरवायचीत आणि तीच आज वारकरी मिरवताना दिसत आहे.
त्यातचं समर्पित आणि प्रसादीत जीवनाचं ते प्रतिक आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघालं त्याचे काही थेंब जमिनीवरती सांडले त्यातूनच तुळस निघाली असं म्हणलं जात. ब्रम्ह देवाने ती विष्णूला दिली अशी कथा स्कंधपुराणात आहे. विठ्लाने तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालून तिच्या भक्ती प्रेमाला अभिमानाने मिरवलय. आणि त्या भक्ती प्रेमाचं प्रतिक म्हणून भगवंताला प्रिय असणारी तुळशीची माळ वारकरी देखील आपल्या गळ्यात घालू लागले आहे. एवढचं नाही तर वारीत तीर्थासारख्या पवित्र तुळशी वृदांवन डोक्यावर घेऊन महिला वारकरी सुद्धा वारीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
जाणून घ्या माळेचे विविध प्रकार –
जप माळ
पाचपट्टी माळ
दोनपट्टी माळ
गोल मण्यांची माळ
डबल पट्टी माळ
चंदन माळ
कातीव माळ
महाराष्ट्रत वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठ महत्व आहे.
- तुळशी माळ गळ्यात परिधान करणे म्हणजे सगळ्या व्यसनांमधून मुक्त होणे.
- विवेकी मार्ग अवलंबने.
- अंगणात तुळशीची पूजा केली जाते .त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते .
- तुळसीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात .
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

