Share

धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके

Published On: 

🕒 1 min read

कॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उद्यापासून श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करू शकतो. ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून डम्बुला येथे सुरु होत आहे त्यात ह्या दिग्गज खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड या दिग्गजांच्या यादीत सामील होता येणार आहे.

धोनी आजपर्यंत ४६० आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने त्यात १५४०९ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ९८ अर्धशतके केली आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी फक्त १०० पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत. अशी कामगिरी करायला धोनीला आता फक्त २ अर्धशतकांची गरज आहे. भारत या मालिकेत ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना खेळणार असल्या कारणाने हे नक्कीच अशक्य नाही.

भारताकडून सार्वधिक आंतराराष्ट्रीय अर्धशतके करणारे खेळाडू
१६४ सचिन तेंडुलकर, सामने-६६४
१४५ राहुल द्रविड, सामने-५०४
१०६ सौरव गांगुली, सामने-४२१
९८ महेंद्रसिंग धोनी, सामने-४६०
७९ मोहम्मद अझरुद्दीन, सामने-४३३
७३ विराट कोहली, सामने-२९८

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!