मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपुत्र अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती आहे. या बैठकीत विखे पाटलांच्या भाजपप्रवेश आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार व रणजितसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या शक्यतेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते.

